शिवधर्म प्रकटन भूमिका


युगायुगांची ओझी आता गळून पडत आहेत. श्वास मोकळे होऊ लागलेत. पंख बळकट होऊ लागलेत. निर्भयपणे झेपावण्यासाठी विशाल आकाश खुणाऊ लागलं आहे.मुख्य म्हणजे आपण आता स्वातंत्र्याची चव चाखली आहे.एक्दा ती चव चाखल्यावर आता पारतंत्र्याचा एक इवलासा बिंदूही सहन होणार नाही,अशी जिभेची अवस्था झाली आहे.आता आपल्याला स्वातंत्र्याची अशी भूक लागली आहे, की ती आता एक-दोन घासांनी भागणार नाही. खरं तर त्या एक दोन घासांनी ती अधिक प्रज्वलितच झाली आहे आणि ती पुर्णपणे भागून तृप्त होण्यासाठी आपण सर्व जण कमालीचे उताविळ झालो आहोत.


==धर्म ही अत्यंत गंभीर बाब==
धर्म ही अत्यंत, अत्यंत आणि अगदी अत्यंत गंभीर बाब आहे आणि आपण त्याच गांभिर्यानं तिच्याकदं पाहिलं पाहिजे.खरा धर्म म्हणजे एखाददुसऱ्या वेळेची भूक भागवणारं भोजन नव्हे. चार-दोन तासांचा सुखद पोरखेळ नव्हे. एखाद्या विद्वानाचं व्यासंगी पांडित्य नव्हे.एखाद्या वक्त्याचं प्रभावी वक्तृत्व नव्हे. एखाद्या साहित्यिकाचा प्रभावी ग्रंथ नव्हे. एखाद्या राजकारण्याचं तात्कालिक सत्ताकारण नव्हे. एखाद्या प्रयत्नवादी माणासाचा एखाद्या पिढीपर्यंत टिकणारा अवखळ हट्ट नव्हे. एखाद्या समर्पणशील जनसमुहाचं अधुरं स्वप्न नव्हे. खऱ्याखुऱ्या धर्मामध्ये हे सगळं आणि यासाअखं बरंच काही कमी जास्त प्रमाणात आणि पूर्ण-अपूर्ण स्वरूपात असू शकतं आणि तरी देखील खऱ्याखुऱ्या धर्माचं सुस्पष्ट दर्शन घडण्यासाठी आपल्याला अजोन खूप काही समजून घेण्याची आवशक्यता आहे. शिवधर्म ही केवळ आज इथे जमलेल्या आपल्या काअही लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारी स्थलकालबद्ध वा व्यक्तिमर्यादित घटना नाही. ती आपल्या असंख्य भावी पिढ्यांना जणू काही त्यांच्या अस्तित्वाचा सांस्कृतिक गाभा आणि त्यांच्या आचार-विचारांचं नैतिक अधिष्ठान देणारी, सर्व प्रकारच्या नकारात्मक मर्यादांच्या पलिकडे जाणारी पवित्र आणि पावक अशी जीवनशैली असणार आहे.


म्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले सात

कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.

एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर.

यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं.

पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.

बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.

मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.

शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.

महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.

अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.

बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.


त्या सात जणांनी मरणाला समोरा समोर ट्क्कर दीली. वास्तवीक पाहता एवढ्या मोठ्या सैन्यासमोर ते सात जण कीती टीकणार?? ते जास्त वेळ तग धरु शकले नाहीत. पण त्यांनी पाय मागेही फीरवले नाहीत व महाराष्ट्राच्या सात वीरांना वीर मरण आले.

केवळ सात जण पंधरा हजार सैन्यावर चढाई करतात यातच सर्व काही आले. दुर्दम्य विश्वास, पराकोटिचे स्वामी प्रेम, शौर्य सार... सार काही. प्रतापरावांप्रमाणेच ते सहा सरदार ही, स्वामीनीष्ठ! त्यातील एकाचेही पाय मरणाला भीऊन डगमगले नाहीत. की त्यांनी आपल्या सेनापतीला पराव्रुत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त स्वामींच्या एका कटाक्षाने हे वीर मरणाच्या स्वाधीन व्हायला तयार झाले.
प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.

वेडात मराठे वीर दौडले सात ॥ धृ. ॥

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥

- कुसुमाग्रज


मी मराठा आहे!

सिंहाच्या जबड्यात घालून हात
मोजीन त्याचे दात
अशी आमची मर्द मराठा जात

कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती |
रणी झेलतो सिंहासा छातीवरती ||
हाकारूनी आव्हानतो जो यमाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

दिला एकदा शब्द न पालटावा |
पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा ||
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

आपत्तीतही पाय मागे फिरेना |
महा संगरी धैर्य ज्याचे गळेना ||
मिळवितो रणी म्लेंच्छ सेना धुळीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

जरी शत्रु कांता प्रसंगी दिसेल |
तिला साडीचोळीनिशी पाठवेल ||
कधी स्वप्नी ना पाप स्पर्शे मनाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

महावादळांच्या विरोधात ठाके |
पुढे संकटांच्या कधीही न वाके ||
पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

धरू खड्गधारा वधू शत्रु पूर्ण |
करू म्लेंच्छ सत्ता बलाने विदीर्ण ||
क्षुधा तहान ऐशी जयाच्या उराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

विना शस्त्र सिंहासवे झुंजणारा |
मुखातील जिव्हा बळे तोडणारा ||
अलंकार ज्याचे करी खड्ग भाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

मानी धर्मनिष्ठा तशी राष्ट्रनिष्ठा |
उरी देवनिष्ठा तशी शीलनिष्ठा ||
सदा कर्मयोगी स्मरे जो ध्रूवाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

मऊ मेणावत बोलण्या वागण्यात |
परी फोदतो वज्र ही ततक्षणात ||
गवसणी धजे घालण्या नभाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

विषाच्याहूनी कडू जो अमाप |
तसा अमृताच्याहूनी गोड खूप ||
सहोदर शोभे नभी भास्कराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

तृषा भागवितो पिऊनी तृषेला |
क्षुधा भक्षूनी संपवितो क्षुधेला ||
तिन्ही ईषणाही पराभूत केल्या |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

नभे किर्तीकांक्षी धनाचा ना दास |
उरी पेटता हिंदवी राज्य ध्यास |
विसारातो क्षणी देशकार्यी स्वतःला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

सहस्त्रावधी शत्रु दिसता समोर |
तरीही खचेना उरातील धीर ||
उफळूनी धावे अरी मारण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

असे मांड घोड्यावरी नित्य घट्ट |
पवनपुत्रासवे गाठतो शत्रु थेट ||
रणी अर्पीतो म्लेंच्छसेना यमला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

असे देह तगडा चिवट ताठ बळकट |
उभट रूंद छाती ग्रीवा घट्ट मनगट ||
फडामाजी कुस्ती करे ततक्षणाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

वसे धैर्यलक्ष्मी अखंडित चित्ती |
करे झुंजूनी शत्रूसेना समाप्ती ||
भिती स्पर्शते ना कधी अंतराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

खड़े सैन्य घेई अटकपार जाई |
जिथे म्लेंच्छ भेटे तिथे सूड घेई |
सदा धाव ज्याची असे उत्तरेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

सुखाच्या स्वये जो न लाचार श्वान |
उरी धमनी ठोक्यासवे राष्ट्रध्यान ||
सदा चित्ती ध्यानी वदे रायगडाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

वसे रोमरोमी स्वधर्मभिमान |
चले श्वास उच्छ्वास शिवबा समान ||
जिणे अर्पिले पूर्णता मायभूला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

असे वृत्ती खड्गाहूनी धारदार |
शराच्याहूनी भावना टोकादार ||
स्वभाव मुळाहूनी असतो चवीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

कृती उक्ती माजी असे एकरूप |
वचनपुर्ततेच्या विना घेई न झोप ||
जगी धर्म मानी वचन पाळण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

महासंकटी जो कधी ही ढळेना |
रणी झुंजता पाय मागे फिरेना ||
रणी भुशिला शब्द भुषविला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

महा साहसाची महा धैर्यतेची |
महा कर्तुकीची महा शुरतेची ||
त्वरे देणगी मागतो जो हरीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

क्षुधासूत पाहता उफाळे समुद्र |
अफाजल्यास पाहता शिवराय रक्त ||
पाहताच संपवतो जो अरिला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

झुकेना कधी संकटाच्या समोर |
रणी खडते ना कधी खड्गधारा ||
हरीची कृपा मानितो संकटाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवा काशिदांचा असामान्य त्याग |
मला ही असा लाभूदे कर्मयोग ||
असे मागतो मागणे नित्य तुळजापदाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

विपत्तीतही चित्त ज्याचे ढळेना |
रणी झुंजता पाय मागे वळेना ||
भवानीपदी पूर्णता वाहिलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

मरण की शरण हा जधी प्रश्न ठाके |
स्वधर्मास्तवे जो सहज देह त्यागे ||
उरी सूर्य आदर्श संभाजी ठेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले |
कटु सत्य हे चित्ती ज्याच्या उमगले ||
तदर्थी धरी बंदूक, खड्ग, भाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

क्लिबांची अहिंसा तसे ब्रम्हचर्य |
स्वधर्मा स्वदेशास्तवे असे नष्टचर्य ||
लाथाडतो थुंकतो जो षंढतेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

कुणी क्रूर भेटे बने लक्ष क्रूर |
त्वरे मारतो पोट फाडूनी ठार ||
शिवाजी जसे फाडीतो अफजल्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

जसा कर्मयोगी तसा ज्ञानवंत |
जरी भक्तीयोगी मनाने ज्वलंत ||
जिणे मायभूपदी अर्पिलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

पुरा ठार मारावया शाहिस्त्याला |
घुसूनी लालमहाली करे खड्ग हल्ला ||
भिती स्वप्नी ना स्पर्शे काळजाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

करे झेंड्यासवे पूर्ण वारी |
तसा म्लेंच्छ्नाशार्थ करणार स्वारी ||
उभयतांमधे भेद वाटे न ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

सदा संतचरणी त्वरे ठेवी माया |
वधे देशद्रोही स्वये म्लेंच्छकुता ||
करे वज्र आव्हान जो म्लेंच्छतेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

रणी धाव घेता असे खड्गहस्त |
विठुवारी माजी बने टाळ हस्त ||
अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

जगी रंजले गांजले कोणी प्राणी |
निवारी तयाची त्वरे दुःखखाणी ||
कुणाच्याही 'दुःखावरी' घाली घाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

म्हणे बाप माझा वसे पंढरीत |
आई राहते नित्य तुळजापुरात ||
तया दर्शनासाठी आतुरलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

कुणी निंदती देशधर्मास दुष्ट |
अशाना झटे पूर्ण करण्यास नष्ट ||
असे आर्तास संस्थापण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

घणाघात घालू मुलुखतख्त फोडू |
पूरे जाळूनी राख पाताळी गाडू ||
अटकपार दौडण्यास आसूसलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

भले शत्रूची माय कांता बहिण |
तिला मानितो जन्मदा माय बहीण ||
अशी धर्मनिष्ठा उरी बाणलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

असे सर्वसाक्षी पुय्रा संस्कृतीचा |
खरा प्राण आत्मा उभ्या भारताचा ||
न सोडी अशा दिव्य भगव्या ध्वजाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

स्वयंस्फुर्त उत्साही जो धैर्यशील |
मनाने नभासारखा हा विशाल ||
कृती उक्तीने पाळतो सत्यतेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

लगीन रायबाच्या आधी कोंढाण्याचे |
कराया गडी प्राण देतो स्वतःचे ||
नरव्याघ्र तानाजी आदर्श ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

स्मरे श्वास घेता जिजाऊसुताला |
उरी आठवितो सईच्या सुताला ||
समजतो तृणासारिखे जो जिण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

रणी धर्म रक्षावया झुंजणारा |
टिचून स्वये शत्रूना मारणारा ||
म्हणे धर्म रक्षावया जन्म झाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

नदी सागराच्याकडे धाव घेई |
सुगंधाकडे भृंगही झेप घेई ||
तसा धावतो शत्रु निर्दाळण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

जरी व्याघ्रसा सिंहसा देहभाव |
परी अंतरी आर्तसा भक्तीभाव ||
सदा देशधर्मार्थ आसूसलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

मनी जागृती स्वप्नीही राष्ट्रचिंता |
झटे निर्मिण्या हिंदवी राज्यसत्ता ||
शिवाजी आकांक्षास्तवे जन्म झाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूना |
तसा चित्ती ध्यातो शिवा काशीदांना ||
सदा सिद्ध त्रयीवत तनु झोकण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिके गर्भवासात झुंजार रीत |
लगीन खड्ग संगे घडे उदारात |
वधाया सदा सिद्ध म्लेंच्छासुराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

नभी ज्याक्षणी होतसे गडगडात |
वनी ततक्षणी डरकाळे सिंहनाद ||
तसा डरकूनी मारतो दुष्मनाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

स्वधर्मावरी कोणी करतो आघात |
तसा मायभूचा करे कोणी घात ||
भिडे आग पायातली मस्तकाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

मनी खदखदे म्लेंच्छ संतापचीड |
आतुर घ्यावया शत्रूचा पूर्ण सूड ||
सदा म्लेंच्छ्नाशार्थ आसुसलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

नसे शत्रूसुडाहूनी श्रेष्ठ धर्म |
घडे धर्मरक्षण जरी जाणू मर्म ||
रणी देशधर्मार्थ ही वाहीलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

धनाच्या रुपाच्याहूनी मानी शील |
खलाच्या पुढे ना कधी ही झुकेल ||
त्यजे स्वभिमानार्थ ही जीवनाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

भरारी गरूडाची बुद्धी कृतीत |
अभयता वनेंद्राची ही अंतरात ||
असे राजहंसवत कृती बोलण्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

दमे ना थके ना झुके ना हटे ना |
कधी हिंदवी राज्यमार्गी चळेना ||
निराशा न स्पर्शे कधी ही उराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

असे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त |
तसा शारदा पुत्रवत जो प्रबुद्ध ||
पदी मारूतीवत असे जो गतीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

उताराकडे वाहाते नित्य पाणी |
विकाराकडे धावतो सर्व प्राणी ||
नसे तोड़ ज्याच्या जगी संयमाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

सुखासीनातेचा असे हाड वैरी |
अथक कर्म्योगात घेई भरारी||
रवीजान्हावीच्या कुली जन्मलेला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

आधी कोंढाण्याचे लगीन लावण्याला |
मुलाचे त्यजूनी धाव घेई गडाला ||
स्वतःच्याहूनी मायभू श्रेष्ठ ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

निखाय्रातूनी हासत चालणारा |
विना ढाल ही शत्रूशी झुंजणारा ||
भितो मृत्यूही ही स्पर्श करण्या ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

जगावे शिवाजी सुटावे जिवंत |
स्वये बैसतो मृत्यूच्या पालखीत ||
शिवा काशिदाच्या धरे जो पथाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

कुणी वीट मारे दगड हेच उत्तर |
दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर ||
स्वये होई वणवा गिळाया आगीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||



मरकर भी नही हटा, वो मराठा!
मरकर भी नही हटा, वो मराठा!!!!

समर भुमिचे सनदी मालक,
षत योध्याचे मानकरी...
रणफ़न्दिची "जात" आमची,
...कोण आम्हा भयभित करी!

देश भक्ती हे पाप असे खरं,
तर मी पापी घोर भयंकर |
मात्र पूण्य ते असेल माझा,
नम्र तरी अधिकार तयावर||

मावळा राजयंाचया सेनेतला एक िशपाई , शूर,वीर,भाेळा,भाबडा,पृामािणकपणाचा पृितक,सवराजयासाठी अापले पृाण अपॅूण टाकणारा एकच माणूस महणजे मद॔॓ मराठी मावळा !!


होय अम्हिच ते वेडे , ज्यांना आस ईतिहासाची.

असेल कोणा ताकद येथे आमच्या सामोरे येण्याची?
अरे नुसत्या फ़ुंकेत उडवूनी टाकू , अशी छाती फ़ोलादाची

पहा चाळुन पाने आमुच्या इतिहासाची. '

महाराष्ट्राच्या मातीला , मराठ्याच्या छातीला, अवघ्या प्रुथ्वीतलावर कधीहि तोड नव्हती, नाहिये आणि यापुढेहि नसनारच. कारण आम्हीच राजे होतो, आम्हीच राजे आहोत अन भविष्यातही आम्हीच राजे राहनार.

आम्ही राजे होतो ते समशेरीच्या जोरवर अन मनगटातल्या बळावर.

होय, मी तोच मराठा ज्या कुळात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून महाराष्ट्र उभा केला राजांनी!

असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही सहिष्णुतेला.

दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची संवेदनाही भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला शॄंगार कधीचं गमावला नाहिये.

घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.

घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्याच हाताने सजते.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक उज्ज्वल भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे मराठयांच्या मनगटात...

अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही मराठयांना संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
मराठा शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला !!!

मराठी पोर आम्ही नाही भीणार मरणाला
सांगुनी गेले मराठी शाहीर अवघ्या विश्वाला
आमच्या नखात आहे सामर्थ्या नांगराचे
या नांगरात आहे मांगल्य सोनियेचे
तीच आमुची जात शाहीरी भवानिची
पोत नाचवत आम्ही नाचतो शपत आहे जबानिची

अंधार होत चाललाय दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे

नेते झाले अफ़जलखान काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे

मराठे झाले यौवनभक्त मराठ्यांच्याच तलवारीवर मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा दिल्लिवर मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव 'हवा' पाहिजे 'हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे
म्हनुनच" राजे... पुन्हा जन्म घ्या"!!

इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||||

-कविराज भूषण
{जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चीत्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात}



मी मराठी..................
मराठ्याची व्याख्या काय?
मी मराठी पण मराठ्याची व्याख्या काय?
ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातुन ;आई,: आसे उदगार निघतात तो माणुस मराठी.
लहान मुलांचे नाव ठेवताना ज्या घरातिल माय,बहिणी शिवाजीचा पाळणा म्हणतात ते घर मराठी माणसाचें..
शिव चरीत्र वाचताना ज्याचा उर अभीमानान भरुन येतो ति छाती मराठी माणसाची...
धर्मविर संभाजी महाराजांचे तुरुंगातले केलेल्या छळ, हालांची कहाणी वाचताना ज्यांच मन शोक संतप्त होउन उठत ते मन मराठी मन...
मराठा मोडेल पण वाकणार नाही
मराठा मोडेल पण वाकणार नाही
पेटतील मशाली वीझतील मशाली
सुर्या कधीच विझनार नाही
प्रयत्न करा किती ही पण
हे कधीच घडणार नाही
मराठा मोडेल पण वाकणार नाही
मराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही
मराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही
आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही

मराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही
शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही
आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही
संपातील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही

=====प्रेरणा मंत्र=====
धर्मासाठी झुंजावे | झुंझोनी अवघ्यासी मारिता||
मारिता मारिता घ्यावे | राज्य आपुले ||
देशद्रोही तितुके कुत्ते | मारोनी घालावे पराते |
देवदास पावती फत्ते | यदार्थी संशयो नाही ||
देव मस्तकी धरावा | अवघासी हलकल्लोळ करावा |
मुलुख बडवावा की बुडवावा | धर्म संस्थापनेसाठी ||
----------------------------------------
---
===== ध्येय मंत्र ====
शिवरायांचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||१||
शिवरायांचे कैसे बोलणे | शिवरायांचे कैसे चालाणे |
शिवरायांची सलगी देणे | कैसी असे ||२||
सकल सुखांचा केला त्याग | म्हाणोनी साधिजे तो योग |
राज्य साधनाची लगबग | कैसी केली ||३||
याहुनी करावे विशेष | तरीच म्हणवावे पुरूष |
या उपरी आता विशेष | काय लिहावे ||४||
शिवरायांसी आठवावे | जीवित तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी उरावे | किर्तिरुपे ||५||
निश्च्यायाचा महामेरू | बहुत जनांसी आधारू |
अखंड स्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||६||

मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेछ्या ....

आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो १० जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला. जंबुर्‍याच्या गोळ्याने जखमी होवून दत्ताजी शिंदे पडले.

दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"

आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उद्गारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"

कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.

त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.

रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले. खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.

दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !
आजचा दिवस बलिदानाचा दिवस. महाराष्ट्रात अस एक घर उरल नव्हत जिथे कोणी आपले प्राण दिले नसतील. अखंड महाराष्ट्र ज्वालांनी वेढला. दत्ताजी शिंदे आणि मराठयांची कत्तल झाली. महाराष्ट्रावर आणि मराठी सत्तेवर दुःखाचा डोंगर कोसळला. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट मराठयांच्या रक्ताने माखुन गेला.

परकिय सत्तेपासून भारत भूमीचे रक्षण करताना मराठी लोकांनी दिलेले बलिदान आज देश विसरुन गेलाय. पानिपत हा तर काही लोकांना विनोदाचा विषय वाटतो. पण लक्ष्यात असु द्या महाराष्ट्रात जेव्हा निर्भयपणे आपले पुर्वज सक्रांत साजरी करत होते तेव्हा लक्ष मराठी सेना आपल रक्षण करण्यासाठी उत्तरेत अब्दालीशी दोन हात करत होती.

चला आपण सर्वांनी आजच्या दिवशी संकल्प करुया,
पानीपतच्या बलिदानाचे गांभीर्य आम्ही आजन्म-आमरण स्मृतीपटलावर ठेऊ आणि हा विषय विनोदाचा होणार नाही याची दक्षता घेऊ.


खैरलांजीच्या ज्वाला

~m¡Õ Yå_ àdV©ZmMm gwdU© _hmoËgd Xoe^a gmOam hmoV AgVmZm [dX^m©Vrb ^¨Smam [OëhçmVrb I¡abm¨Or JmdmV ^moV_m¨Jo HwQy¨~mVrb Mma bmoHm¨Zm JmdHè`m¨Zr RoMyZ _maÊ`mMr Hb¨HrV KQZm KSbr. _[hbm-_wbm¨Mmhr Á`m¨Zr [dMma Hobm OmUma Zmhr, EdTr ZamY_Vm HmoUË`mhr nmVirda jå` Ré eHV Zmhr. OmVr` _mZ[gHVoVyZ OÝ_bobr hr [dH¥Vr \wbo-emhy-Am¨~oSHam¨À`m _hmamï—mV KSmdr, `mgmRr cm[OadmUr Jmoï Xwgar Zmhr.

`mg¨X^m©V d¥ËVnÌm_YyZ Hmhr CbQ-gwbQ ~mVå`mhr à[gÕ Pmë`m. Ë`mVb¨ gË`-AgË` Oo Hmhr Agob Vo VnmgmA¨Vr nwTo `oB©bM. nU Hm`Xm hmVmV KoDZ, bmoHemhrMm _wSXm nmSyZ H¥Ë` HaÊ`mMo A[YHma HmoUmbmhr XoVm `oUma Zmhr. I¡abm¨Or_Ü`o Omo Z¥e¨g àHma KSbm Vmo _mZdVobm-_mUwgHrbm cmO[dUmam hmoVm. `m àHaUmV nmocrg `¨ÌUm g¨doXZmeyÝ`nUo dmJbr. ñWm[ZH amOHmaU-JmddmSçmVrb OmVr` _mZ[gHVm `m¨Mmhr `m àHaUmda à^md nSbm. àHaU Xm~y-XSnyZ QmHÊ`mn`©¨V hmbMmbr Pmë`m. nU Am¨~oSHadmXr MidirVrb bmoH AmVm AÝ`m` ghZ HéM eHV Zmhr. _hmamï—mV amï—r` Hm±J«og Am[U amï—dmXr Hm±J«og¨M `wVr gaHma Amho. Ama.nr.Am`. Mo gd©M ZoVo XmoÝhr Hm±J«ogMr gmï-Hmoï O_dyZ AmhoV. Ë`m_wi¨ Am¨~oSHar OZVoZ¨ I¡acm¨Or àHaU CËñ\wV©nUo hmVr KoVb¨. gaHmaZo I¡acm¨Or àHaUmV Mm¡HergmRr [Xa¨JmB© Hobr. Amamonr COi _mÏ`mZ¨ JmdmV [\aV am[hbo. ZoV¥Ëd [dhrZ `m Am¨XmobZmMm [MaSÊ`mMo à`ËZ Hobo OmVrb. Am¨XmobZ A[YHM ^SHb¨, Va [anpãcHZ ZoVohr ~°Za-nmoñQa KoDZ CVaVrb HmaU ñWm[ZH ñdamÁ` g¨ñWm¨À`m [ZdSUyHm nwTo AmhoV. AZoH bmoH I¡acm¨Orbm ^oQ XoDZ OmV AmhoV. J¥h_¨Ìr Ama.Ama.nmQrb `m¨Zmhr I¡acm¨Orbm ^oQ [Xbr. CÚm [dcmgamd Xoe_wI qHdm eaX ndma, gmo[Z`m Jm¨Yrhr I¡acm¨Orbm nmohMVrb. àíZ ZoË`m¨À`m ^oQrMm Zmhr. ^oQr Z XoVmM AÝ`m`J«ñVm¨Zm Ý`m` XoÊ`mMm Amho. amÁ`HVo© Á`m IwMuda ~gbo AmhoV. [VWyZM Ë`m¨Zm Ý`m`mMr gwÌo hc[dbm `oVmV. Ë`mgmRr ~wS PQdV-hbdV I¡acm¨Orn`©¨V Ywi CSdÊ`mMr JaO Zmhr. ^¡æ`mcmc ^moV_m¨JoM HwQw¨~ Á`m JmdmV OJb¨ [VWM¨ Ë`m¨Zm Rma HaÊ`mV Amb¨, Ë`m JmdmV OmÊ`mMrhr BÀNm Am¨Hmjm _éZ OmUo, hr ^maVr` cmoHemhrbm Hmir_m \mgUmar ~m~ Amho. _hmamï— gaHma hmJUmXmar _wºrMm S¨Hm [nQyZ HamoSmo én`o IM© HarV Amho nU Amnbr Jmd¨ _Zwé½U _wº hmoUma Ë`mgmRr Hmhr HaUma Amho Hr Zmhr? I¡acm¨Or àHaUmVyZ CRboë`m Á`mcm¨à_mUo _hmamï—mMo Z^m¨JU nwÝhm Hcm¨[HV hmoUma Zmhr, `mgmRr HRmoa Cnm``moOZm HaUma Hr Zmhr?

बदनाम आपणच होतोय…


उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये कोण्यातरी माथेफिरू माणसाने बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना केली. काल दिवसभर संपुर्ण महाराष्ट्रात याचे भयंकर प्रतिसाद उमटत होते. आजही बऱ्याच ठिकाणी संचारबंदी चालू आहे. मुंबाईमध्ये तर काल डेक्कन क्वीन आणि एक लोकल ट्रेनही जाळली.

काय होतय हे आजकाल? कुठे जात आहोत आपण? ही आपलीच चळवळ आहे का? बाबासाहेबांना हेच अपेक्षीतहोतं?

आपण बाबासाहेबांचे वाटेने जाणारे ज्ञानमार्गी आहोत. बाबासाहेबांबद्दल आपण सर्वांनाच नितांत आदरआहे.त्यांच्याबद्दल आपल्या भावना इतक्या उत्कट आहेत की त्यांच्याविरुद्ध आपण एक शब्दही सहन करूशकत नाही. हे सगळं बरोबर आहे पण आजकाल आपली चळवळ ज्या मार्गानं जातेय तो मार्ग त्यामहामानवाच्या नावाला शोभणारा मुळीच नाही.

आपण प्रत्येक अपमान मुकाट्याने सहन करावेत असं कोणीच म्हणणार नाहे, पण हिंसाचार हा काही बुद्धाचामार्ग नाही. खैरलांजीमध्ये जे काही झालं ते किंवा कानपुरची घटना ह्या निश्चितच निषेधार्ह होत्या पण आपलामार्ग मात्र चुकीचा होता. यामुळे आपणच बदनाम होत आहोत. ‘यांना दुसरं येतच काय?’ अश्या तऱ्हेच्याप्रतिक्रिया आत्तच यायला लागल्या आहेत.

ही वेळ आहे खरंच आपल्याला काय काय येतं ते दाखवण्याची! ‘यांना दुसरं येतच काय?’ म्हणण्याअगोदर त्यांनादहा हज्जार वेळा विचार करावा लागला पाहिजे,असं करून दाखवण्याची! असं करून दाखवण्याची की यांच्यापायाकालची जमीन सरकली पाहिजेत.

आणि या जमिनीला आताच हादरे बसायला लागले आहेत. बुडाखालच्या सरकारी नोकरीच्या खुर्च्याखिळखिळ्या व्हायला लागल्या आहेत. अशावेळी आपल्या बदनामीसाठी त्यांना बहाणा पुरवण्यात कसलाशहाणपणा!

ही आग लवकर विझायला हवी. मनाला नवनवे मोहर फुटू द्या! आसमंत भारून जाऊ द्या आपल्या मोहराच्यासुगंधाने! आपल्याला हा मोहर देणाऱ्या वसंताची पुण्यतिथी लवकरच येतेय. एका नव्या आत्माभिमानानेत्यांना सामोरे जाऊया! पुढच्यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर जातांना आपल्या मान लाजेने नाहे तर फक्तकृतज्ञतेनं झुकलेली असावी.

या पुन्हा एकदा मनापासून प्रतिज्ञा करूया-

पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि
(मी सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करेन अशी मी प्रतिज्ञा करते/करतो)


प्रेरणा

एकदा लग्न झालं की , आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असा वाटण्याची जागा मग,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.

मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.

आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की ...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की...
निवृत्त झालो की...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो .

खरं असंय, की आनंदात असण्यासाठी , सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का ?

जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत राहतं .
पण, मध्ये बरेच अडथळे असतात . काही आश् वासनं पाळायची असतात , कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं....
आणि अगदी शेवटी कळतं , की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं .

या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही .
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.

शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी ... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो. एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते . पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा .
आता जरा या पुढे दिलेल्या प्रश् नांची उत्तरं द्या पाहू -

- जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू .
- गेल्या पाच वर्षांत विश्वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
- या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
- गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?

हं! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण, असं वाटलं नसलं तरी, या प्रश् नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच , नाही का?
टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो .
पदकं आणि चषक धूळ खात पडतात.
जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.

आता या चार प्रश् नांची उत्तरं द्या पाहू -
- तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
- तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?
- आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
- तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं .

क्षणभर विचार करा.
आयुष्य अगदी छोटं आहे.
तुम्ही कोणत्या यादीत असाल? काही अंदाज लागतोय ?
मी सांगतो.
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये .

आता एक गोष्ट.
काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती .

पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं .

धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.
त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले.
सारे मागे फिरले... सारे जण...

" डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, "" आता बरं वाटतंय ?''
मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले .

ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...
त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात .
का?
कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.

आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.

शक् तितक्या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल . कदाचित इतरांचंही...

दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का?