शिवधर्म प्रकटन भूमिका


युगायुगांची ओझी आता गळून पडत आहेत. श्वास मोकळे होऊ लागलेत. पंख बळकट होऊ लागलेत. निर्भयपणे झेपावण्यासाठी विशाल आकाश खुणाऊ लागलं आहे.मुख्य म्हणजे आपण आता स्वातंत्र्याची चव चाखली आहे.एक्दा ती चव चाखल्यावर आता पारतंत्र्याचा एक इवलासा बिंदूही सहन होणार नाही,अशी जिभेची अवस्था झाली आहे.आता आपल्याला स्वातंत्र्याची अशी भूक लागली आहे, की ती आता एक-दोन घासांनी भागणार नाही. खरं तर त्या एक दोन घासांनी ती अधिक प्रज्वलितच झाली आहे आणि ती पुर्णपणे भागून तृप्त होण्यासाठी आपण सर्व जण कमालीचे उताविळ झालो आहोत.


==धर्म ही अत्यंत गंभीर बाब==
धर्म ही अत्यंत, अत्यंत आणि अगदी अत्यंत गंभीर बाब आहे आणि आपण त्याच गांभिर्यानं तिच्याकदं पाहिलं पाहिजे.खरा धर्म म्हणजे एखाददुसऱ्या वेळेची भूक भागवणारं भोजन नव्हे. चार-दोन तासांचा सुखद पोरखेळ नव्हे. एखाद्या विद्वानाचं व्यासंगी पांडित्य नव्हे.एखाद्या वक्त्याचं प्रभावी वक्तृत्व नव्हे. एखाद्या साहित्यिकाचा प्रभावी ग्रंथ नव्हे. एखाद्या राजकारण्याचं तात्कालिक सत्ताकारण नव्हे. एखाद्या प्रयत्नवादी माणासाचा एखाद्या पिढीपर्यंत टिकणारा अवखळ हट्ट नव्हे. एखाद्या समर्पणशील जनसमुहाचं अधुरं स्वप्न नव्हे. खऱ्याखुऱ्या धर्मामध्ये हे सगळं आणि यासाअखं बरंच काही कमी जास्त प्रमाणात आणि पूर्ण-अपूर्ण स्वरूपात असू शकतं आणि तरी देखील खऱ्याखुऱ्या धर्माचं सुस्पष्ट दर्शन घडण्यासाठी आपल्याला अजोन खूप काही समजून घेण्याची आवशक्यता आहे. शिवधर्म ही केवळ आज इथे जमलेल्या आपल्या काअही लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारी स्थलकालबद्ध वा व्यक्तिमर्यादित घटना नाही. ती आपल्या असंख्य भावी पिढ्यांना जणू काही त्यांच्या अस्तित्वाचा सांस्कृतिक गाभा आणि त्यांच्या आचार-विचारांचं नैतिक अधिष्ठान देणारी, सर्व प्रकारच्या नकारात्मक मर्यादांच्या पलिकडे जाणारी पवित्र आणि पावक अशी जीवनशैली असणार आहे.


1 comment:

नितीन गर्गे said...

जगाला असा अडांणचोट खोटारडा धर्म शिवधर्म म्हणून सांगून तुम्ही शिव नावाचा पण अपमान करता,
भूमीचे, शत, अजुन ला अजोन म्हणणारे तुम्ही अशुद्ध भाषी अजान वाले आहात खरे,शिव नाव लावले की सर्व शिवाजीमय होईल अस नाही , कारण शिवराळ भाषा पण असते त्यात शिव म्हणजे शिव्या युक्त, घाणेरडा, तसाच हा वाइट हेतु ने दुसऱ्यांच्या धर्माचा अपमान करणारा घाणेरडा धर्म शिवधर्म, मुस्लीम मराठा आरक्षणाचे तुकडे तोंडावर फेकून मराठा मुस्लीम मते खाणारे अराष्ट्रवादी खरे क्षुद्र विचारी शिवधर्म